‘शिव स्थाळी’च्या धर्तीवर विद्यार्थ्यांना जेवण देण्याची मागणी

WhatsApp Image 2020 02 03 at 4.18.05 PM

चाळीसगाव , प्रतिनिधी | राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यज्ञेश रवींद्र बाविस्कर यांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन ‘शिवभोजन थाळी’ उपक्रम सुरु केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यज्ञेश बाविस्कर यांनी ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील जेवण्याची व्यवस्था करण्याची मागणी याभेटीत केली.

शिवभोजन थाळी सुरू करून एक आगळा वेगळा उपक्रम चालू केला असून त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. ना.  छगन भुजबळ हे प्रत्येक गोष्टीत एक वेगळेपणाने काम करून त्यात झोकून देतात ही महत्त्वपूर्ण बाब असून कौतुकास्पद आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण भागातील गरीब सामान्य कुटुंबातील तरुण मंडळी शहरांमध्ये क्लासेस आणि अभ्यास करून अधिकारी होत असतात. या गरीब विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शिवभोजन थाळी सुरू केली आहे. अगदी त्याचप्रमाणे तरुणांना जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. यातून ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे आधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल अशी विनंती केली आहे.

Protected Content