यावल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  ; उपजिल्हाधिकारी भारदे यांनी घेतला आढावा

यावल, प्रतिनिधी । कोरोना संसर्गच्या वेगाने वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणाही खबरदारीचा उपाय म्हणुन अधिक सज्ज झाली असुन आज यावल येथे तहसील कार्यालयात याच विषयावर मार्गदर्शन व आढावा बैठक उपजिल्हाधिकारी रविन्द भारदे यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली होती.

आज यावलच्या तहसील कार्यालयाच्या दालनात उपाजिल्ह्यधिकारी रविन्द भारदे यांनी यावल तालुक्यातील कोरोना संसर्गच्या संदर्भातील सविस्तर तपसिलवार माहीती तहसीलदार जितेन्द्र कुवर , निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील , अव्वल कारकुन एम. एफ. तडवी, सुयोग पाटील, महसुल लिपिक दिपक भुतेकर , दिपक बाविस्कर, पुरवठा विभागाचे राजेश भंगाळे यांच्या माध्यमातुन सविस्तर आढावा जाणुन घेतला. त्याचप्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्रासाठी शासनाच्या नविन अटीशर्तीचे काटेकोर पालन व प्रशासनाची भुमिका आणि नागरी सुरक्षा विषयी प्रशासनास घ्यावयाची काळजी याविषयी रविंद्र भारदे यांनी मार्गदर्शन करून महसुल प्रशासनास येणाऱ्या काळात अतिदक्ष राहण्याच्या सुचना दिल्यात .

Protected Content