फैजपूर युवक काँग्रेस अध्यक्षपदी वसीम तडवी

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील डी. एन. कॉलेज येथे युवक काँग्रेस मेळावा (दि. ०७) रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वसीम तडवी यांची युवक काँग्रेस शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील तसेच धनंजय चौधरी यांची कार्यक्रमात प्रमुखाने उपस्थिती होती. तसेच रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम जनाब, यावल रावेर विधानसभा कार्याध्यक्ष मुदस्सर जनाब, जावेद जनाब मारूल, फैजपूर शहर अध्यक्ष रियाज, नगरसेवक मोहसीन खान, जिल्हा सरचिटणीस रामाराव मोरे, जिल्हा सचिव बबन तायडे व मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले.

Protected Content