मनवेल डाक विभागातर्फे भगवान पाटील यांचा गौरव

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल डाक कार्यालयातील पोस्ट मास्तरांनी कोवीड-१९ महामारीच्या संकट काळात भुसावळ विभागात सर्वाधिक ग्राहकांचे खाते उघडल्यांमुळे त्यांचा प्रमाणपत्र देऊन विभाग प्रमुख पी. बी. सेलुकर यांच्याहस्ते पोस्ट मास्तर भगवान पाटील यांचा छोटेखानी कार्यक्रमात गौरव करण्यात आला. दि. ७ नोव्हेंबर रोजी येथील अंगणवाडीत भुसावळ डाकघर विभागाकडून पोस्ट खात्याच्या आधार एपीईएस अंतर्गत उष्कृष्ट काम विविध योजना व पोस्ट मास्तरच्या उष्कृष्ट कर्मचारी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी डाकघर निरीक्षक पी. एस. मालकर, साकळी पोस्ट मास्तर रमेश कुंभार, केदार बडगुजर, डी.आय अग्रवाल, भरत तेली विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते. यावल आगारातील सेवानिवृत कर्मचारी दगडु पाटील यांनी इंडीयन पोस्ट आँनलाईन बँकेच्या सेव्हिंग खाते उघडून ग्रामीण पातळीवर पैसांची गरज ज्याला भासेल तिथेच पैसे मिळणार असल्याने त्याचे कौतुक डाकअधिक्षक यांनी कौतुक केले. यावेळी पुरुषोत्तम पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंग पाटील, अनिल पाटील, गोरख पाटील, काशिनाथ पाटील, शांताराम पाटील, वासुदेव पाटील, अशोक पाटीलसर, दगडी पोलीस पाटील, विठ्ठल कोळी यांचेसह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

येथील पोस्ट मास्तर भागवत सिताराम सरोदे यांनी तसेच त्यांचे सहकारी जीवन उभारणे. या दोघा मिळून गेल्या महिन्यात भुसावळ विभागात सर्वाधिक खाते उघडून विशेष कामगिरी दाखविले म्हणून त्यांचा गौरव आज करण्यात आला. पोस्ट ऑफिसमध्ये आता बँक सुविधेप्रमाणे सर्व सुविधा कमी दरामध्ये उपलब्ध होणार आहेत. अनेक सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. त्यामुळे पोस्ट ऑफिसचा जास्तीत जास्त उपयोग ग्राहकांनी करून घ्यावा, असे आवाहन विभागप्रमुख सेलूकर यांनी केले आहे. तसेच ग्राहकांनी बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये आपले खाते ओपन करून पोस्ट खात्याला सेवा करण्याची संधी द्यावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Protected Content