शासकीय काटा पूजन कार्यक्रमात तहसीलदारांकडून पक्षपातीपणा -शिवसेनचा आरोप

यावल, प्रतिनिधी | येथील शासकीय काटा पूजन कार्यक्रमाचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रण देण्यात आले नसून तहसीलदार पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप यावल शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

 

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, आज रविवार दि. २ जानेवारी रोजी यावल येथे शासकीय काटा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आमंत्रण शिवसेना तालुकाप्रमुख, शहर प्रमुख,  पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारचे आमंत्रण देण्यात आले नाही. प्रत्येक वेळेस शिवसेना पदाधिकारी व प्रमुख यांना हेतुपुरस्कर डावलण्यात येते. हा आम्हाला डावलण्याचा प्रकार निंदनीय असून याचा आम्ही तीव्र निषेध करतो. निवेदनावर जिल्हा उप्रमुख जिल्हा मुन्ना पाटील, तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, माजी तालुका प्रमुख कडू पाटील, शरद कोळी, सुनील बारी, संतोष खर्चे, पप्पू जोशी, भरत चौधरी, सारंग बेहेडे, योगेश पाटील, सागर देवांग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content