समाज का नेता कैसा हो मनोज जरांगे जैसा हो ! जयघोष करत मराठा समाजाचा जल्लोष

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण देशाचे लक्ष वेधणारे ऐतिहासीक आंदोलन करणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास यश मिळाल्याबद्दल यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील भुसावळ टी पॉईंट वर फटाके फोडून व पेढे आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी समाज का नेता कैसा हो मनोज जरांगे जैसा हो ! एक मराठा लाख मराठा ! तुमचं आमचं नातं काय-जय जिजाऊ-जय शिवराय, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मनोज जरांगे यांचे गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचे सांगून मराठा समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळाले असे त्यांनी सांगितले, यामुळे भविष्यात समाजाच्या पुढील पिढीला शैक्षणिक व नोकरी विषयक आरक्षणाचा लाभ मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.

या वेळी आनंदोत्सवात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवलेयांच्यासह मोठया संख्येत मराठा समाजातील तरूण या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

Protected Content