भागवत चौधरी यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे पारोळा तालुकाध्यक्ष भागवत चौधरी यांच्यासह अशोक चौधरी, बबलू चौधरी, राहुल चौधरी, चेतन पाटील, दिनेश भामरे, योगेश चौधरी यांनी एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व खा. उन्मेषदादा पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
भागवत चौधरी यांना भाजपने ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पवार, खा. उन्मेषदादा पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, ना. गिरीषभाऊ महाजन आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात. दरम्यान यावेळी तालुक्यातील लोणी बु. येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर बापूराव केदार यांची भाजपा अनुसुचित जाती मोर्चाच्या पारोळा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांना एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पवार यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष दिपक अनुष्ठान, भाजपा शहराध्यक्ष मनीष पाटील, पारोळा युवा मोर्चा शहराध्यक्ष नवल चौधरी, मा. नगरसेवक पी.जी.पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ. आसिफ कुरेशी, जिल्हा चिटणीस अलीम ईशा, जितेंद्र गिरासे, कैलास पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content