जातीनिहाय जनगणनेची केंद्राची तयारी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जातीनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मोदींनी  योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं असल्याचं आज  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलं.

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या मागणीसाठी १० सदस्यीय शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींशी संवाद साधला आणि आपल्या मागण्या पंतप्रधानांपुढे ठेवल्या. जातीनिहाय जनगणनेसाठी उत्सुक नसलेल्या भाजपचाही या शिष्टमंडळात समावेश होता. या चर्चेनंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

आम्ही सर्वांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली. आमची जी बाजू आहे ती पूर्णपणे आम्ही पंतप्रधानांसमोर मांडली. जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही का करत आहोत हेही त्यांना पटवून दिलं आहे. या संदर्भात निश्चितच योग्य निर्णय घेण्यात येईल असं आश्वासनही पंतप्रधानांनी आम्हाला दिलं आहे असे नितीशकुमार म्हणाले .

 

Protected Content