दहावी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन कसे करावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोना महामारी नंतर प्रथम प्रत्यक्ष माध्यमिक शालांत परिक्षेला सामोरे जाताना ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे, वेळेचे नियोजन ,परिक्षेसाठी मानसिकता व शारीरिक आरोग्य यांची काळजी कशी घ्यावी तसेच लेखन व वाचन यातील गती प्राप्त करून यश कसे संपादित करता येईल. याविषयी डॉ. कांचन नारखेडे (मानसोपचारतज्ज्ञ तथा कार्यक्रम अधिकारी) ज्योती पाटील (समुपदेशक), विनोद गडकर (मनोविकार परिचारक) यांनी मार्गदर्शन केले.

सदरील कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी.बी.कोळी, कलाशिक्षक सतिष भोळे व शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक तायडे, चंदन खरे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content