आव्हाण्यात रॅपीड अँटीजेन टेस्ट; पहिल्याच दिवशी १७ पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे येथे रॅपीड अँटीजेन चाचण्यांना सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी १७ जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहेत.

कोरोनाच्या रुग्णांची ग्रामिण भागात वाढती संख्या बघता रॅपिड अँटेजीन टेस्ट घेण्यात येत आहे. यानुसार शुक्रवारी आव्हाणे येथे अँटीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

यामध्ये पहील्याच दिवशी १७ कोरोना बाधीत आढळून आले. याबाबतची अधिक माहिती पंचायत समिती सदस्य अ‍ॅडव्होकेट हर्षल चौधरी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली. यात त्यांनी सांगितले की, कानळदा गावातील सहा नागरिकांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली असता तीन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर आव्हाणे गावातील ४५ नागरिकांची टेस्ट केली असता १४ नागरिक हे पॉझिटिव निघाली ची माहिती पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. चौधरी यांनी दिली. त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले की आव्हाणे गावाला कोरोणा मुक्त करण्यासाठी रॅपिड अँटेजीन टेस्ट वाढवून अधिक अधिक लोकांची तपासणी करण्यात येणार आहेत. यासाठी आज शनिवारी देखील टेस्ट करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले.

Protected Content