धक्कादायक : सुशांतच्या डायरीतील काही पानं फाटलेली ; महत्वपूर्ण पुरावे नष्ट झाल्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या सुशांतच्या डायरीतील काही पानं फाटलेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही डायरी आता सीबीआयच्या हाती लागली आहे. मात्र आता या डायरीची काही पानं फाडल्याचे समोर आल्यामुळे महत्वपूर्ण पुरावे नष्ट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

सुशांत नियमित डायरी लिहायचा. याबाबत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकितानेही माहिती दिली होती. तर सुशांतचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनीदेखील या डायरीचा उल्लेख केला होता. या डायरीत सुशांत बऱ्याच महत्वपूर्ण गोष्टी लिहित होता. अगदी जूनमध्ये मुंबई पोलिसांनी सुशांतच्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांना बरीच माहिती मिळाली. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती आणि शोबिज चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती त्यांना मिळाली. कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने नोंदी केल्या होत्या. त्यामुळे सीबीआय तपासात सुशांतची ही डायरी खूप महत्त्वाची आहे. या डायरीतून अनेक खुलासे होऊ शकत होते. मात्र या डायरीतील काही पानं गायब आहेत. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार या डायरीत एका नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतरची पानं गायब असल्याचे म्हटले आहे.

Protected Content