नंदूरबारच्या पाच वर्षीय मंथनची लाखोच्या खर्चाची शस्त्रक्रिया एरंडोलमध्ये मोफत

 

एरंडोल, प्रतिनिधी । आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून नंदूरबार येथील मंथन विनोद राजपूत याचे दोन ते तीन लाखांचे ऑपरेशन मोफतमध्ये करण्यात आले. 

काही दिवसांपूर्वी मंथनची तब्बेत अचानक खराब झाली होती. मंथनला जवळच्या दवाखान्यात ऍडमिट केले. डॉक्टरांनी त्याला सुरत येथे घेऊन जाण्यासाठी सांगितले. मंथनला सुरतला घेऊन गेले. मंथनचे सर्व रिपोर्ट व तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये त्याच्या डोक्यामध्ये गाठ आहे असे सांगण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या गाठीचे ऑपरेशन लवकरात लवकर करावे लागेल असे सांगितले . तसेच त्या ऑपरेशनचा खर्च तीन-चार लाखांच्या वर येणार असा डॉक्टरांनी सल्ला दिला.परंतू मंथनच्या वडिलांची परिस्थिती खर्च करण्यासारखी नव्हती . त्यांनी मंथनला परत नंदुरबार या ठिकाणी घेऊन आले. मंथन चे धुळ्याचे नातेवाईक प्रदीप धरमदास पाटील यांनी जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला. जितेंद्र पाटील यांनी मंथनचे सर्व रिपोर्ट व्हाट्सअँप द्वारे मागून घेतले. जितेंद्र पाटील यांनी वाडिया हॉस्पिटलचे डॉ, उदय अंडार यांना सर्व रिपोर्ट पाठवले. डॉ. उदय अंडार यांनी  मंथनला लवकरात लवकर ऍडमिट कारण्यासाठी सांगितले. मंथनच्या आई वडिलांनी मंथनला दुसऱ्याच दिवशी मुंबईला वाडिया हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. ऑपरेशन ईमरजन्सी असल्यामुळे हॉस्पिटल वाल्यांनी त्यांना ऑपरेशन चे पैसे भरण्यास सांगितले. पण मंथनच्या वडिलांजवळ तेवढे पैसे भरण्याची परिस्थिती नव्हती. त्यांनी श्री द्र पाटील यांच्याशी संपर्क केला.  जितेंद्र पाटील यांनी त्यांना कुठेही एक रुपया न भरण्यासाठी सांगितले. जितेंद्र पाटील यांनी तात्काळ आदिती  तटकरे ( राज्य मंत्री, महाराष्ट्र )यांच्या पी ए सोबत बोलणे केले.  तटकरे मँडमांचे  पीए यांनी मंत्रालयात निखिल पाटील ( नातेवाईक ) यांना तात्काळ बोलवले. आदिती तटकरे मँडमांच्या लेटर वर रू.2 लाख आँपरेशन साठीमंजूर करण्यात आले. निखिल पाटील  यांनी ते लेटर हॉस्पिटल ला सबमिट केले. आणि मंथनचे ऑपरेशन तात्काळ करण्यात आले. मंथनचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले.मंथन चे ऑपरेशन  पूर्णपणे मोफत मध्ये करण्यात आले. मंथनच्या  आईवडिलांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले.

 

Protected Content