मधूस्नेह परिवारातर्फे सहाशे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

cf7a30d5 2c31 42af b416 4aa112ddc158

 

फैजपूर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील सुमारे सहाशे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन दि २३ जून रोजी मधूस्नेह संस्था परिवारातर्फे करण्यात आल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, मधूस्नेह संस्था परिवार म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांनी जोपासलेल्या संस्थांचा समूह, आपल्या नियत कार्यासोबतच सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम ही परिवार राबवित असतो. यापूर्वी वृक्षारोपण, जलसंधारण, क्रीयाशील शिक्षक सन्मान, पू. बाबासाहेब सातारकर यांचा किर्तन सोहळा, सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलु काही’, पं. हृदयनाथ मंगेशकर व सलील कुलकर्णी यांचा ‘मैत्र जिवाचे’ हा कार्यक्रम, वारकरी संगीत संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यापैकीच गुणवंत विद्यार्थांचा ‘गुणगौरव सोहळा’ हा एक कार्यक्रम आहे.

 

स्कॉलरशीप, दहावी, बारावी, विद्यापीठीय परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त करणारे विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व युवक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे लोक यांचा सन्मान या सोहळ्यात केला जातो. त्या मागील हेतू समाजातील गुणवंत, कर्तृत्ववान लोकांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक करुन अधिक प्रगती गाठण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करणे, समाजात गुणवंत लोकांचे कौतुक होतांना फारसे दिसत नाही. ज्यांचा सत्कार होणार त्यांना आम्ही त्यांच्या पालकांना ही सोबत आणण्याचा आग्रह करतो. कारण आपल्या पाल्याचा सत्कार, सन्मान होतांना पाहून त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असतो. समाजातील बुध्दिमान लोकं/विद्यार्थी या कार्यक्रमामुळे समाजा समोर येतात. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचा नेहमी आग्रह असायचा की, ग्रामीण भागातील गुणवंतांचे कौतुक हायला पाहिजे, ते समाजासमोर आले पाहिजेत.

 

यापुर्वी झालेल्या सोहळ्यांना प्रसिध्द विधीज्ञ अॅड. उज्वलजी निकम, ज्येष्ठ पोलीस अधिकारी डॉ सुहास वारके,अतुल राणे (आय.आर.टी एस) गायक सलील कुलकर्णी, कवि संदीप खरे, भारोत्तोलन पटू दिपाली नारखेडे(मलकापुर),प्रा भुषणा पटवर्धन, डॉ सौ. जयश्री माके,डी.वाय.एस.पी सी पाटील, प्री डॉ प्रीती अग्रवाल असे मान्यवर अतिथी म्हणून लाभले होते. या वर्षीचा गुणगौरव सोहळा रविवार दि. २३ जुन २०१९ रोजी सकाळी १० वाजता जेहरा, लॉन्स, रावेर रोड, सावदा येथे आयोजित करण्यात आलेला आहे,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

या कार्यक्रमात सुमारे ६०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून अतिथी म्हणून अँड रविंद्रभैय्या पाटील (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), अॅड संदिपभैय्या पाटील (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पार्टी), राजू तडवी (प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका), दिलीप सुर्यवंशी (सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.) हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ शिरीष चौधरी या कार्यक्रमाला अधिकाधिक लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मधुस्नेह संस्था परिवाराने केले आहे. पत्रकार परिषदेला धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, पाल सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील, डी फार्मसीचे प्राचार्य आर.एल. चौधरी हे उपस्थित होते.

Protected Content