डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाच्या गणरायाचे विसर्जन (व्हिडीओ)

school

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले असून आज दि. 10 सप्टेंबर रोजी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच बाप्पाला निरोप देत जल्लोषात विसर्जन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सालाबादप्रमाणे यंदा ही गणरायाची स्थापना करण्यात आली होती. काही दिवसांच्या मुक्कामी आलेल्या गणरायाचे आज वाजत-गाजत विसर्जन करण्यात आले आहे. तसेच या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. जसे भक्ती गीत गायन, कथाकथन, प्रश्नमंजुषा, नकाशा लेखन इत्यादी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले आहे. बक्षीस स्वरुप विद्यार्थ्यांना बडबड गीते, रंगभरण व बोधकथा असे पुस्तके दिले आहेत. आणि दूपारी शाळेतच गणरायाचे ढोल-ताश्यांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता चौधरी तर आभार प्रदर्शन प्रमोद इसे यांनी केले.

Protected Content