आमदार डॉ. पाटील यांच्या हस्ते लोणी खुर्द येथे रस्त्याचे भूमिपूजन (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 09 10 at 6.54.05 PM

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या लोणी खुर्द या ठिकाणी सोमवार दि.९ सप्टेंबर रोजी  रस्त्याचे भूमिपूजन आमदार डॉ.सतिष पाटील यांच्या हस्ते कामाच्या बोर्ड  फलकाचे उद्घाटन  व रस्त्याचे भूमिपूजन नारळ वाढवून करण्यात आले.  यावेळी सर्व उपस्थितांना आमदार पाटील यांनी पेढे भरवून त्यांचे तोंड गोड केले.

सविस्तर माहिती अशी की , गेल्या अनेक वर्षांपासून कासोदा ते पारोळा हा २२ कि.मी.च्या रस्त्यावर लोणी, लोणी सिम, लोणी खुर्द, नगाव म्हसवे या गावातील रस्त्यावर  मोठ-मोठे खड्डे पडलेले होते. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते असा प्रश्न वाहनधारकांना व  गावकऱ्यांना पडला  होता. या रस्त्यावर अनेक छोटे- मोठे अपघात देखील होत होते. बांधकाम विभाग यांना वेळो वेळी लेखी निवेदन देण्यात आले होते.  परंतु याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे  हे स्पष्टपणे दिसून येत होते. या मार्गावरील गांवातील  शाळेतील  विद्यार्थ्यांचे बस येत नसल्याकारणाने तारंबळ उडत होती.  पारोळा बसस्थानक प्रमुख यांना बस येत नाही म्हणून तक्रार केली असता त्यांनी रस्ता खराब असल्याचे सांगितले.  आमदार डॉ.सतीष पाटील यांना ही बाब ग्रामस्थांनी लक्षात आणुन दिली असता आमदार पाटील यांनी रस्त्याची पाहणी करून तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी अवघ्या ८ कि.मी.च्या अंतरावरील कामाचे टेंडरपास करुन अर्थसंकल्पिय निधी २०१९-२० यानुसार ८३ लाख रुपये निधी मंजुर करून आणला.  धरणगाव येथील ठेकेदार निलेश रमेश पाटील यांना काम दिले आहे. गांभीर्याने काम करण्याचे सांगून व अवघ्या २ च महिन्यात कामपूर्ण करण्याचे आदेश आमदार पाटील यांनी ठेकेदारांना दिले.  कार्यक्रमाप्रसंगी लोणी खुर्द सरपंच सुनील पाटील, लोणी सीम सरपंच कपुरचंद पाटील, दामू पाटील, रघुनाथ पाटील प्रेमराज पाटील, नागराज पाटील, गोकुळ पाटील, माजी सरपंच सुभाष पाटील, अशोक पाटील ,विनायक पाटील, आबाजी पाटील, दिनकर पाटील, विजय पाटील यांच्यासह नगाव – म्हसवा येथील सरपंच , उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,व तिन्ही गांवातील ग्रामस्थ , शाळकरी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी आमदार डॉ. सतिष पाटील यांचे  लोणी गांवातील महिलां सरपंचांनी कौतुक केले. तर ग्रामस्थांनी आमदार डॉ. पाटील यांचा शाल,पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार केला.  यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की , माझ्या विजयात या तिघं लोणीचां मोलाचा सहभाग आहे. २०१४ साली निवडणुकीत मोदी लाटेत ही आपण सर्वांनी माझी साथ सोडली नाही व मला  निवडून आणून तालुक्याचा आमदार म्हणुन तुम्हा सर्वांच्या सेवेची संधी दिली व तसेच या भागातील पूर्वीचे रस्ते देखील त्यांनीच करून दिले होते अशी आठवण यावेळी सांगितली.

Protected Content