मलकापूर येथे १५-१६ सप्टेंबरला होणार अंगणवाडी कर्मचारी यूनियनचे राज्य अधिवेशन

istockphoto 898227924 612x612 1

चोपडा, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यूनियनचे नववे राज्य अधिवेशन मलकापूर (जि. बुलढाणा) येथे येत्या १५-१६ सप्टेंबरला घेण्यात येत आहे. राष्ट्रीय कामगार नेते कॉ. भालचंद्र कानगो त्याचे उद्घाटन करणार असून अध्यक्षस्थानी यूनियनचे राज्य अध्यक्ष सूकूमार दामले असतील. विशेष आमंत्रित म्हणुन आ.राहूल बोंद्रे (चिखली) आ.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) स्वागताध्यक्ष म्हणुन नगराध्यक्ष अॅड.हरिष राऊळ उपस्थित राहणार आहेत.

 

यावेळी मार्गदर्शन आयटकचे राज्य अध्यक्ष सी.एन. देशमूख, राज्य आयटक सचिव शाम काळे, युनियनचे राष्ट्रीय सचिव डॉ.विजयालक्ष्मी (बंगळुरू), यूनियनचे राज्य कार्याध्यक्ष दिलिप उटाणे, राज्य सरचिटणीस अॅड.माधुरी क्षीरसागर करणार आहेत तर निमंत्रक कॉ.जे.एच. मौर्य असतील. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, पेंशन तसेच मोबाईल वापरण्यातील अडचणी, मूलांना गरोदर स्तनदा मातांना ताजा दर्जेदार खाऊ मिळणे, अंगणवाडी केंद्राची अवस्था, कर्मचारी रिक्त जागा भरणे, संदर्भात महिला व बालकांचे हक्क सरकारचे धोरण संदर्भात ठराव व पुढील काळात संघटनेचा कृती आराखडा यावर निर्णय घेण्यात येईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्य़ातील सेविका मदतनिस यांनी १४ सप्टेंबर शनिवारी सायंकाळी भूसावल रेल्वे स्टेशनवर सायं ६.०० वाजेपर्यंत रॅली व अधिवेशनात सहभागी होण्यासाठी जमावे, असे आवाहन जिल्हा यूनियनचे अध्यक्ष कॉ.अमृत महाजन, सचिव ममता महाजन, सहसचिव प्रेमलता पाटील, नंदा वाणी, निलीमा पाटील, मीनाक्षी काटोले, वत्सला पाटील, उपाध्यक्ष सुमित्रा बोरसे, प्रभावती कोळी, सूनंदा पाटील, सूलेखा पाटील, मंगला पाटील, भारती पाटील, शारदा नाईक, प्रमिला पाटील, गुप्त्यारी तडवी, नूरून्निसा, लक्ष्मी तायडे, आदींनी केले आहे.

 

Protected Content