सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत याची महत्वाची माहिती दिली. प्रसिध्द लेखिका सुधा मुर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचं नामांकन राज्यसभेसाठी केल्यानं मला आनंद होत आहे. असे पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहलं आहे. सुधा मूर्ती यांचं सामाजिक कार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात योगदान मोठं आणि प्रेरणादायी आहे.
सुधा मूर्ती या लेखिका तर आहेतच पण त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. इन्फोसिसच्या सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. सन २००६ मध्ये त्यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे. त्या मूळच्या कर्नाटकातील शिगगाव इथल्या आहेत. आयआयएससीमधून त्यांनी एमईपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांनी आजवर २० विविध विषयांनी पुस्तकं लिहिली आहेत.

Protected Content