नाना पटोले यांची राज्यपालांवर टीका

 

मुंबई: वृत्तसंस्था ।  महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय सुरू असल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिले. त्याची दखल घेवून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय चालत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

 

यावेळी पटोले यांनी विधानसभा अध्यक्षापदाबाबतही भाष्य केलं. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत आहेत. ते राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा करतील. त्यानंतर अध्यक्षपदाचं नाव हायकमांडकडे पाठवलं जाईल. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

अॅड. परमार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यावर आरोप केले होते. त्यावेळी ईडी किंवा सीबीआय आडवी येत नव्हती. फडणवीस त्यावेळी प्रत्येकाला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देत होते, असं सांगतानाच सध्या मोदींचे सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांना बोथट करण्याचे पाप करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरणावरही मोठं भाष्य केलं. वाझे प्रकरणात जी स्क्रीप्ट फडणवीस यांनी वाचून दाखवली त्याच घटना कशा घडल्या? हे बीजेपीचे षडयंत्र होते का असे चित्र निर्माण झाले आहे. यावरून आम्ही भाजपाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू, विरोधकांना त्याबाबतचा जाब विचारू, असं ते म्हणाले.

 

शेतकरी कायदा विधीमंडळात आणण्यापूर्वी पब्लिक डोमेनमध्ये टाकावा जेणेकरुन शेतकऱ्यांना हवा तसा कायदा करता येईल अशी आमची मागणी राहील, असंही त्यांनी सांगितलं.

 

Protected Content