Home Cities जळगाव वेतन मिळाले ! ; मनपा शिक्षकांकडून उपमहापौरांचा सत्कार (व्हिडिओ)

वेतन मिळाले ! ; मनपा शिक्षकांकडून उपमहापौरांचा सत्कार (व्हिडिओ)

0
43


जळगाव, प्रतिनिधी ।  महापालिकेचे निवृत्त व कार्यरत शिक्षक यांचे थकीत निवृत्तीवेतन आणि वेतन अदा करण्यात आल्याने आज त्यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला. 

सेवानिवृत्त शिक्षक मो. इकबाल पटेल, अ. हमीद शेख, अ. मुनाफ शेख, मो. सलीम, अलहरूद्दीन शेख, मुजफ्फर खान यांनी आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा त्यांच्या दालनात त्यांचा सत्कार केला.  याप्रसंगी स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, नगरसेवक नवनाथ दारकुंडे उपस्थित होते.  महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या   ४६५ सेवानिवृत्त  शिक्षकांचे ८ महिन्यांपासून  व १२ कार्यरत शिक्षकांचे १७ महिन्यापासून वेतन थकीत होते. यामुळे या शिक्षकांसह व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यांना मोठ्या आर्थिक अडचणीना सामना करावा लागत होता. या सर्व शिक्षकांची अडचण स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक  व उपमहापौर  कुलभूषण पाटील  यांनी लक्षात घेऊन पाठपुरावा केला होता. कार्यरत शिक्षकांचे १७ महिन्याचे व सेवानिवृत्त शिक्षकांचे ७ ते ८ महिन्यांचे वेतन थकीत होते. थकीत वेतन मिळाल्याने महापालिकेच्या शिक्षकांची समाधान व्यक्त केले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/337172421199686

 


Protected Content

Play sound