काँग्रेस सत्तेत असतांना चेल्यांसह तिजोरी भरण्याचे काम केले – मुख्यमंत्री फडणवीस ( व्हिडीओ )

raver fadnvis

रावेर (प्रतिनिधी)। विदेशातून आणणारा काळा पैश्यावर काँग्रेसची नजर आहे. मोदींनी काळ्या पैश्यांवर कारवाई करायची, देशाच्या तिजोरी पैसे आणायचे आणि काँग्रेसने सांगायचे की पैसे आले ते वाटून टकू, आता हे कशा हवे आहे पैसे वाटायला, देशाने यांना वाटण्यासाठी संधी दिली होती मात्र त्यांनी त्यावेळी त्यांच्या तिजोरीत नेला. त्यावेळी असलेला पैसे आपल्या चेला चपाट्यांना वाटला. गरीबाची गरीबी तुम्ही दूर केली नाही तर गरीबी वाढविली. काँग्रेसचा जाहिरनामा म्हणजे कोंबड्या विकण्यासारखा आहे. असे टिकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉग्रेससह इतर मित्र पक्षावर सोडले.

व्यासपिठावर यांची होती उपस्थिती
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, प्रभारी आमदार चैनसुख संचेती, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, विजया राहटकर, आमदार संजय सावकरे, प्रल्हाद महाजन, माधुरी नेमाडे, जि.प.सदस्या नंदकुमार महाजन यांच्यासह पदाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आता गरीबाच्या खात्या 72 हजार रूपये खात्यात देवून गरीबी हटविणार असल्याचे सांगितले. ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टी काँग्रेस आता करत आहे. पणजोबाला सत्ता दिली त्यांनी गरीबी हटविली नाही, आजीच्या हातात सत्ता दिली त्यांनी गरीबी हटविली नाही, त्यांच्या वडीलांच्या हतात सत्ता दिली त्यांनी गरीबी हटविली नाही, त्यांच्या आईच्या हातात सत्ता दिली त्यांली गरीबी हटविली नाही आणि आता राहुल गांधी 72 हजार रूपये दरवर्षाल गरीबांच्या खात्यात जमा होईल असे सांगत गरीबी हटविण्याचे सांगत आहे. आज यांच्या बोलण्याकडे कोणाचा विश्वास नाही. कोठून देणार गरीबांना 72 हजार रूपये दरवर्षी, अशी पोकळ आश्वासने देवून मतदारांची फसवणूक करत आहेत.

रावेर मतदार संघात विविध कामांची पुर्तता
नाथाभाऊ मंत्री असतांना त्यांनी अनेक योजनेच्या माध्यामातून निधी आणून विकास कामे केले. रावेर मतदार संघातील शेळगाव बॅरेज 770 कोटी मंजूर केली, मेगा रिचार्ज योजना हा जगातला सातवा अजूबा असून याच्या माध्यमातून 4 लाख एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांच्या मागणीमुळे मेगा रिचार्ज योजनेला मान्यता मिळाला असून याचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते करू असे आश्वासन दिले. युवा खासदार रक्षा खडसे यांनी विविध विकास कामांसाठी कोट्यावधी निधी आणला. गावोगावी जावून समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यामुळे भागातील वेगवेगळे कामे त्यांच्या माध्यमातून आणला आहे. आज केद्रात असतांना अनेक कामे येत्या काळात होणार आहे असेही मुख्यमंत्री यांनी रावेरच्या प्रचार सभेत सांगितले.

काँग्रेस नेत्यांची झोप उडाली
काँग्रेसचे नेते रात्री झोपतात तर त्यांना मोदींजीचे स्वप्न पडतात. त्यामुळे त्यांना झोपही लागत नाही, अचानकपणे झोपेतून उठून मोदी मोदी करत असतील. त्यांना ही निवडणूक झोपू देत नाही. त्यांन अस्वस्थ करणारी आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी संकल्पना मोदी सरकार यांनी राबविली असून दिलेल्या प्रत्येक योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात मिळत आहे. जन धन योजना, शेतीची विमा योजना, ड्रीपची योजना, शौचालयाची योजना, घरकुलाची योजना यासाठी कोणालाही चक्र मारायची गरज नाही. योजनांसाठी कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याची गरज नाही. योजनांचे पैसे थेट दिल्लीपासून खात्यात वर्ग होत आहे.

मोदी सरकाच्या काळात विविध योजना आणल्या
मोदी सरकारच्या काळात जीवनाच्या परिवर्तनामुळे विकास झाला आहे. पूर्वी 45 टक्के लोकांकडे शौचालय होते. आतापर्यंत हे प्रमाण 98 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. उज्वला गॅस योजना अंतर्गत गरीब व मजूर यांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत गरिबांना घरे देण्याचे संकल्पना मोदी सरकारने राबविण्यात आली होती. ज्यांना जागा नाही त्यांना जागा, ज्यांचे घर अतिक्रमाणात होते त्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात आले. ग्रामीण आणि शहरातील गरिबाला घर देण्याचे काम मोदीजींनी केले आहे. देशाच्या सरदाराला 75 वर्षे पूर्ण होतील त्यावेळी प्रत्येक गरिबाला घर स्वतःचे घर राहणार आहे. मुद्राच्या अंतर्गत 50 कोटी लोकांना 50 हजारापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात आले. यामध्ये थेट रक्कम खात्यात जमा होते दरवर्षी 75 कोटी हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. गेल्या तीन वर्षात या जिल्ह्यांमध्ये 2300 कोटी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला दिले आहे.

 

 

Add Comment

Protected Content