पाचोरा शहरात युवासेना सदस्य नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरात युवासेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानास युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने, सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने राज्यभर सुरू असलेल्या युवासेना सद्स्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवार दि. २६ एप्रिल रोजी पाचोरा शहरात सुद्धा नोंदणी अभियान राबवण्यात आले. शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय व महाराणा प्रताप चौक याठिकाणी नोंदणी करण्यात आली. या नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून ५०० हुन अधिक युवकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली. पुढील टप्यात आता ग्रामीण भागात सदर नोंदणी उपक्रम राबवण्यात येईल. यावेळी शहर प्रमुख किशोर बारवकर, युवानेते सुमित पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे, सौरभ चेडे, संदीपराजे पाटील, योगेश पाथरवट, जितेंद्र पाटील, सागर पाटील, राहुल पाटील, आबा कुमावत, सुनिल गौड, मोहित राजपूत, शाहरुख, जय बारवकर, बापू हटकर, भूषण पाटील, शुभम इंशी, विजय भोई सह मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.

Protected Content