Home राजकीय नाथाभाऊ आमचे जुने सहकारी, त्यांना जरुर भेटणार : उद्धव ठाकरे

नाथाभाऊ आमचे जुने सहकारी, त्यांना जरुर भेटणार : उद्धव ठाकरे

0
102


khadse thakre
 e

मुंबई (वृत्तसंस्था) नाथाभाऊंसोबत आमचे राजकारणापलीकडील संबंध आहेत. तसेच नाथाभाऊ आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केलीय. त्यानुसार मी त्यांना भेटणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.

 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी सध्या चर्चेचा विषय आहे. एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. तर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाथाभाऊंसोबत आमचे राजकारणापलीकडील संबंध आहेत. आम्ही त्यांना जरूर भेटणार आहोत. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तत्पूर्वी लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. कुणी कुणाला भेटावे याचा सर्वांना अधिकार आहे. तसेच नाथाभाऊ आमचे जुने सहकारी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.


Protected Content

Play sound