….. तर उमेदवारांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेऊ – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

मुंबई वृत्तसंस्था | “जर एखादा उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराबाबत असंसदीय वक्तव्य करतांना आढळला तर आयोग स्वतःच्या अधिकारांचा वापर करून अशा उमेदवारांना परीक्षा देण्यापासून देखील वंचित ठेऊ शकतं.” असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका म्हटलं आहे.

भरती प्रक्रियांबाबत अनेकदा विविध प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे आणि सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांकडून चुकीच्या भाषेचा वापर करण्यात येत असल्याचे असे आयोगाचे म्हणणे असून अशाप्रकारे उमेदवार हे लोकसेवा आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचत आहे. त्यामुळे सोशल मिडीया वा इतर माध्यमातून असंसदीय वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात महाराष्ट्र लोकसेवा आयोग कारवाई करणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केलेल्या या निर्णयावर विद्यार्थ्यांनी व्यक्त होत आपल्या प्रतिक्रियेतून संताप व्यक्त केला आहे.

 

Protected Content