
नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरात गेल्या २४ तासात ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. तशात आज जवळपास १९ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा २२५ वर पोहोचला आहे.

नागपुरातील सतरंजीपुरा परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनला आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढली आहे. नागपूरातील सतरंजीपूरा परिसर कोरोना साखळीचे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. या परिसरात एका व्यक्तीपासून सुरु झालेला कोरोना संसर्ग अद्यापही थांबलेला नाही. या परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. शिवाय या भागातून क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह येण्याचे सत्र सुरुच आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ हजार ७५८ वर पोहोचला आहे.


