विधीमंडळातील विरोधकांच्या अधिकारावर गदा : फडणवीस

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकार विधीमंडळाचे अधिवेशन हे मनमानीपणाने ढकलून नेत असून विरोधकांच्या अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज पहिल्याच दिवशी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजणार असल्याचे संकेत कधीपासूनच मिळाले होते. मराठा व ओबीसी आरक्षणासह अनेक मुद्यांवरून भाजपने सत्ताधार्‍यांना घेरण्याची रणनिती आखल्याची चर्चा सुरू होती. आज पहिल्याच दिवशी याची चुणूक दिसून आली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपचा आमदारांनी पायर्‍यांवर बसून जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

अधिवेशन सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हे अधिवेशन नियमानुसार जास्त काळ चालायला हवे होते. मात्र सरकार दोन दिवसात हे अधिवेशन आटोपण्याच्या तयारीत आहे. विरोधकांची आयुधे यातून गोठविण्यात येत आहेत. यातच एकाच दिवसात कायदा आणण्याची तयारी सुरू असून हे लोकशाहीच्या संकेतांना हरताळ फासणारे असल्याची टीका देखील फडणवीस यांनी केली.

Protected Content