बिग ब्रेकींग : एकनाथराव खडसेंना विधानपरिषदेचे तिकिट !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिकिट दिले असून या माध्यमातून त्यांचे जवळपास पावणे तीन वर्षांनी राजकीय पुनर्वसन होणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे बलाढ्य नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथराव खडसे हे २०१४ साली सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद भेटल्यावर खडसेंना १२ महत्वाची खाती मिळाली. तथापि, २०१६ साली मे महिन्यात त्यांच्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. यात भोसरी येथील भूखंड खरेदी आणि दाऊद इब्राहिमच्या बायकोशी कथित संवादासह अन्य आरोपांचा समावेश होता. यामुळे ४ जून २०१६ रोजी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर भोसरी भूखंड वगळता अन्य आरोपांमध्ये क्लीन चीट मिळूनही त्यांना नंतर मंत्रीपद मिळाले नाहीत. तसेच २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकिट देखील नाकारण्यात आले. यामुळे अस्वस्थ झालेल्या नाथाभाऊंनी ऑक्टोबर २०२१ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

यानंतर काही महिन्यांनी त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाठविण्यात आले. तथापि, ही यादी अजून देखील मंजूर करण्यात आलेली नाही. परिणामी गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबीत होता. आता विधानसभेच्या दहा जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंगे्रसने एकनाथराव खडसे यांना संधी दिली आहे. त्यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. या माध्यमातून आता एकनाथराव खडसे यांचा राजकीय वनवास संपून त्यांचे सभागृहात आगमन होणार आहे. तर आगामी मंत्रीमंडळ विस्तारात नाथाभाऊंना संधी मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: