धरणगाव महाविद्यालयाचा ९५.१६ टक्के निकाल

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९५.१६ टक्के लागला आहे.

कला विभागातून अश्विनी संजय कुमारे (७७.८३), वाणिज्य विभागातून अंकित दानेज (८८.३३ टक्के) विज्ञान विभागातून अंकित पाटील (८८.१७ टक्के) प्रथम आला. एकूण परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थी ४७६ होते. त्यापैकी ४५३ विद्यार्थी उत्तीर्ण असून महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९५.१६ टक्के लागला आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष व्ही. टी. गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संस्थेचे संचालक अजय पगारीया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार, उपप्राचार्य प्रा. आर. आर. पाटील, प्रा. बी. एल. खोडे कार्यलयीन अधीक्षक डी. जी. चव्हाण, ग्रंथपाल प्रा. पी. आर. देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!