विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वादळी वार्‍यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने खिरोदा येथे एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

रावेर तालुक्यातील बर्‍याच परिसराला काल सायंकाळी वादळी वार्‍याने जोरदार तडाखा दिला. यामुले खिरोदा तसेच परिसरातील गावांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी पत्रे उडाली. तसेच तारा देखील खाली पडल्या. यामुळे या भागातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, आज सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणार्‍या अफसर अजित तडवी याच पाच वर्षाच्या बालकाचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. काल वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने या चिमुकल्याला प्राण गमवावा लागल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान. या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर, महावितरणने तातडीने खाली पडलेल्या तसेच लोंबकणार्‍या तारांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: