पिंप्री शिवारात तीन गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; ५ जणांवर गुन्हा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री गाव शिवारातील तापी नदीच्या काठी असलेल्या ३ गावठी दारूच्या हातभट्या यावल पोलीसांनी उध्वस्त केल्या असून या गुन्ह्यातील पाच संशयित आरोपी फरार झाले आहे. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अंजाळे व परिसरात मोठ्या प्रमाणात अत्यंत घातक रसायनांद्वारे गावठी दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना मिळाली होती. या अनुषंगाने आज ९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलीसांनी भालशिव पिंप्री गाव शिवारातील तापी नदीच्या काठावर बेकायदेशीररित्या ३ ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू तयार करताना दिसून आले. पोलिस आल्याचे पाहून गावठी दारू तयार करणारे ५ जण हे घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी पोलीसांनी ४ हजार लिटर गावठी दारू पाळण्याचे पक्के रसायन नष्ट केली. ५० लिटर तयार दारू हस्तगत केली. यावल पोलीस स्टेशनला त्या अज्ञात फरार झालेल्या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी मागील काही दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या गावठी दारू पाण्याची हातभट्ट्या व दारू विकणारयांवर कायद्याचा बडगा दाखवल्याने अशाप्रकारे अवैध धंदे करणाऱ्यांवर चांगलाच वाचक बसला असून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केलेल्या कारवाईचे कारवाईची सर्वत्र कौतुक करण्यात येत असून विशेषतः महिला वर्गामध्ये या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content