यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरुच

valu lilav

यावल प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून तालुक्यात विविध ठिकाणी मोठया प्रमाणावर अवैध वाळु विक्रीचा धंदा जोमाने सुरू असून महसुल विभागाकडुन होत असलेली वाळु माफीयावरील कारवाई ही फक्त देखाव्याची आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण एकीकडे महसुली यंत्रणा काही अवैध वाळु वाहतुक करणारे वाहने जप्त करून दंडात्मक कारवाई करीत असते तर दुसरीकडे मात्र वाळु माफीयाचे दिवसेंदिवस प्रस्त वाढत असल्याचे चित्र आहे.

या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरासह संपुर्ण तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाळु माफीयांनी धुमाकुळ माजवुन घातला आहे. तर महसुल विभागाने अशा प्रकारे अवैधरित्या वाहनातून वाळुची वाहतुक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी गाव सजानिहाय तलाठी, मंडळ अधिकारी व महसुलच्या कर्मचाऱ्यांचे पथकांची नेमणुक केली असुन देखील वाळु माफीया हे महसुली अधिकारी यांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे. तसेच वाळुची अनधिकृतपणे तालुक्यातुन जवळ ४० ट्रॅक्टरव्दारे वाळु माफीया गौण खनिजची वाहकतुक करीत असल्याचे दिसुन येत आहे.

यावर तातडीने दखल घेणे गरजेचे
यावल तालुक्यात अनेक ठिकाणी घरे बांधणीचे कामे सुरू असुन या घर बांधकामाला लागणारी वाळु कुठुन येते याची आदी चौकशी होणे गरजेची आहे. तरच वाळु माफीयाच्या विरोधात कारवाई होणे शक्य होईल, काही विश्वसतांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, काही वाळु तस्करी करणाऱ्यांनी आपले रासकीय पुढाऱ्यांशी संबंध ठेवल्याने ती व्यक्ति कुणालाही न जुमानता काही हप्ते खाऊ महसुली कर्मचाऱ्यांशी त्यांचे लागेबांधे असल्याने महसुल विभागाकडुन कधी व कशी कारवाई होणार असल्याची बिकट माहीती मिळत आहे. ते वेळेआधीच सावध होवु जात असल्याने महसुल यंत्रणेला कारवाई करणे शक्य होत नसल्याची माहीती मिळत आहे. अशा प्रकारे आर्थिक लोभापोटी जर महसुलचा कारभार चालेल तर मग वाळु माफीया प्रतिबंध लावणे हे केवळ दिखावाच म्हणावा लागेल, महसुल यंत्रणेने आपल्या कारवाई दिशा बदलणे अत्यंत गरजे असुन तसे झाल्याशिवाय वाळु माफीयावरील कारवाई योग्य दिशेने जाणार नाही.

Protected Content