जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। ।  जळगाव शहरातील जी.एस. मैदान येथे हिंदू जनजागृती समितीच्या झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २ जणांवर मंगळवारी ९ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने २५ डिसेंबर रोजी जळगाव शहरातील जी.एस. मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आयोजित केलेल्या जाहीर सभेत प्रशांत जुवेकर रा. जळगाव आणि सुरेश चव्हाणके रा. दिल्ली दोन समाजात तेढ निर्माण होतील, असे आक्षेपार्ह विधान व भाषण केले. तसेच पोलिसांनी सभेसाठी दिलेल्या   अटी शर्तीचे उल्लंघन केले होते. अखेर ४ महिन्यानंतर ९ मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भरत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात प्रशांत जुवेकर आणि सुरेश चव्हाणके या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

Protected Content