शेंदुर्णीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा साधेपणाने साजरा होणार

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी । शतकाकडे वाटचाल करणारा येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळा कोरोनामुळे पहिल्यांदा साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

खान्देशातील विख्यात संतकवि व भगवंत भक्त वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरु असलेल्या व शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या श्रीराम जन्मोत्सवाचे यंदाचे हे ९९ वे वर्ष आहे. मात्र यंदा करोनाच्या प्रादुर्भावाने व शासनाच्या लॉकडाऊनमुळे इतिहासात प्रथमच हा उत्सव अगदीच साधेपणाने साजरा करण्याची वेळ आली आहे. यामुळे होणारे कीर्तन, श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन, पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

पुरातन मंदिर
शेंदुर्णीतील हे श्रीराम मंदिर अतिशय पुरातन असुन ३०० वर्षीपुर्वीचे आहे. मंदिरात पांढऱ्या संगमरवरी दगडातील श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या सुबक सुंदर, विलोभनीय मुर्ती असुन समोरच हनुमंत हात जोडून उभे आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा अतिशय साधेपणाने व तीनच व्यक्तींच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला होता. तर आज श्रीराम नवमीला सुद्धा घरघुती वातावरणात चारच लोकांच्या सह श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरातच राहुन करोनावर मात करावी ,शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन श्रीरामचंद्र देवस्थानचे वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content