यावल वनविभागात २५ किलो डिंकासह मोटरसायकल जप्त; वनविभागाची कारवाई

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहमांडली ते बोरखेडा मार्गाच्या रस्त्यावर दुचाकी मोटरसायकलव्दारे अवैधरित्या काढण्यात आलेल्या डिंकाची वाहतुक करतांना यावलच्या वन विभागाच्या वतीने झालेल्या कार्यवाहीत मुद्देमालासह मोटरसायकल जप्त करण्यात आली असून संशयित आरोपी मोटरसायकल सोडून पसार झाला आहे.

याबाबत वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुका क्षेत्रातील सातपुडा या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहमांडली ते बोरखेडा या रस्त्यावर वनविभागाचे पथक गस्तीवर असतांना अज्ञात संशयित व्यक्ति पांढऱ्या रंगाच्या सुझुकी मोटरसायकलन अवैधरित्या काढलेला धावडा जातीचा सुमारे २७५० किंमतीचा २५ किलो डिंक व सुमारे १८ हजार रूपये किंमतीची मोटरसायकलसह मुद्देमाल यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे यांच्या कार्यक्षेत्रातील वनरक्षक जीवन नागरगोजे, वनरक्षक कृष्णा शेळके, वनरक्षक प्रकाश बारेला, वनरक्षक जितेन्द्र सपकाळे व वन मजुर यांनी केलेल्या कार्यवाहीत जप्त करण्यात आले आहे. दरम्यान कर्तव्यावर असलेले वन विभागाचे कर्मचारी यांना पाहून घटना स्थळावरून संशयिताने पळ काढला.

 

Protected Content