जळगावात दोन घावूक प्लास्टिक विक्रेत्यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड

5e6f32fe 6f39 4345 8743 2d0e1ea089a0

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील फुले मार्केट आणि सुभाष चौक भागातील प्रत्येकी एका घावूक दुकानदारावर आज (दि.९) महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी प्लास्टिक व थर्माकोल उत्पादन बंदी कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली आहे.

 

अधिक माहिती अशी की, आज दुपारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शहरात १६ दुकानांची तपासणी करून सुमारे ५५ किलो नॉन ओव्हन बॅग जप्त केल्या. यादरम्यान फुले मार्केटमधील गोपालजी बोरडा व सुभाष चौकातील जवाहर प्लास्टिक या दोन विक्रेत्यांवर प्रत्येकी पाच हजारांच्या दंडाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई क्षेत्र अधिकारी डॉ. प्रभाकर वावडे, आरोग्य अधीक्षक संजय अत्तरदे, आरोग्य निरीक्षक डी.डी. गोडाले, आर. व्ही. कांबळे, मुकादम रफिक शेख व भारत ढंढोरे यांच्या पथकाने केली.

Protected Content