Home क्राईम तरूणाला घरात घुसून बेदम मारहाण

तरूणाला घरात घुसून बेदम मारहाण

0
58


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील जुना आसोदा रोड परिसरात बॅट मिंटन खेळण्याच्या कारणावरून एका तरूणाला दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना बुधवारी  घडली. या घटनेबाबत रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जुना आसोदा रोडवरील वडामळा येथे पुष्पक विजय सोनवणे वय २१ हा तरूण वास्तव्याला आहे. बुधवारी ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पुष्पक सोनवणे हा तरूण काही मुलांसोबत बॅटमिंटन खेळत होता. त्यावेळी याच परिसरात राहणारे लोकेश नरहर इंगळे आणि आकाश नरहर इंगळे या दोघांनी पुष्पकला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पुष्पक हा शेजारी राहणाऱ्यांच्या घरात घुसला. तेव्हा लोकेश इंगळे आणि आकाश इंगळे यांनी घरात घुसून पुष्पकला बेदम मारहाण करून डोक्याला दुखापत केली. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुष्पक सोनवणे याने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजून १७ मिनीटांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात मारहाण करणारे  लोकेश इंगळे आणि आकाश इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound