Home Cities भुसावळ भाजप व्यापारी प्रकोष्ठच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मनोज बियाणी

भाजप व्यापारी प्रकोष्ठच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मनोज बियाणी

0
47


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोज बियाणी यांची भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी प्रकोष्ठच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मनोज बियाणी हे आमदार संजय सावकारे यांचे कट्टर समर्थक असून त्यांची भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी प्रकोष्ठ या विभागात प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकोष्ठचे प्रदेश संयोजन विरेंद्र कुकरेजा यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

या नियुक्तीबद्दल मनोज बियाणी यांचे ना. गिरीश महाजन, आ. संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound