वेले फाट्याजवळ अपघात; दोन तरूण ठार

चोपडा प्रतिनिधी | तालुक्यातील वेले फाट्याजवळ भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील वाघळून येथील हर्षल भिका पाटील (वय २०), नितीन निंबा भील (वय २३) व ऋषीकेश छोटू पाटील (वय २२, तिघे रा. वाघळूद, ता. धरणगाव) हे तिन्ही मित्र ऋषीकेश याच्या मोठ्या बहिणीचे सासरी चोपडा येथे भेटायला दुचाकीने गेले होते. दुपारी ते घरी परत येत असतांना त्यांच्या क्रमांक एमएच-१९, बीसी-७८०४ क्रमांकाच्या दुचाकीला वेळी वेले फाट्याजवळ समोरून येणार्‍या भरधाव मालवाहू वाहनाने (क्रमांक एमएच-१८, एए-२३०३) जोरदार धडक दिली.

या अपघातात नितीनचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल याला उपचारासाठी नेत असतांना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला. ऋषीकेश याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content