कोरोनाला ‘कोरोना’ असं का म्हणतात?

 

भुसावळ : कोरोना व्हायरस ही एक प्रकारची फॅमिली आहे त्याला “लिफाफा विषाणू” Envelop virus असं देखील म्हणतात.
याचा अर्थ ते एका तेलकट कोटमध्ये लेपीत असतात, ज्याला लिपिड बायलेयर (चरबी सारखा चिकट व पाण्यात न विरघळणारा स्तर) म्हणून ओळखले जाते, ते प्रोटीनने भरलेले असतात जे एखाद्या मुकुटच्या अणकुचीदार टोकेसारखे दिसतात व त्या साहायाने ते चिकटून राहतात. थंडी जितकी जास्त तितके तेलाचे आवरण कडक / घट्ट होत जाते व त्याची मजबूत होते.

 

लॅटिन भाषेत मुकुटाला ‘कोरोना’ म्हणतात व त्यावरूनच ‘कोरोना’ हे नाव या विषाणूला देण्यात आले आहे. तर Covid 19 म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज व कोविड -१९ हा कोरोना विषाणू रोग आहे आणि पहिल्या संक्रमित व्यक्तीची डिसेंबर २०१९ मध्ये पॉझिटिव्ह चाचणी झाली ; म्हणून त्याला COVID-19 असे म्हणतात. कोविड 19 हा कोरोना कुटुंबातील एक नवीन व घातक सदस्य मनाला जातो.

 

करोनाचा नवीन विषाणू हा सार्स म्हणजे सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम- सीओव्ही १ विषाणूचा दुसरं रुप आहे. त्यामुळे त्याला कोव्हीड १९ बरोबरच सार्स सीओव्ही २ असंही नाव देण्यात आले आहे. आता करोनाचा हा विषाणू 215 हून अधिक देशात पसरलेला आहे. या विषाणूच्या संसर्गावर उपचारच नाहीत असे सांगितले जात असले, तरी त्यात पूर्ण तथ्य नाही. कारण जगात इतर अनेक विषाणूजन्य रोग आहेत. त्यावर मात करण्यात पूर्वीच यश आले आहे. मनुष्य कोरोनाचा शोध 1960 तर पशु कोरोनाचा शोध 1930 साली लागला होता. जसा जसा विषाणू वाढत गेला तसा घातक झाला. वर्ष 2003 पासून कोरोनाला सार्स म्हणजेच सिव्हीअर ऍक्युट रिस्पायटरी सिंड्रोम (SARS) असं म्हंटलं जातं होतं. श्वासनातील आजाराचा एक गंभीर आजार मनाला जातो.

 

निलेश गोरे,
हिप्नॉथेरपीस्ट आणि सायकॉलॉजीकल काउंसलर,
वेलनेस काऊंसलिंग, नवशक्ति आर्केड,
जामनेर रोड, भुसावळ.
9922851678

Protected Content