Home Uncategorized कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द !

कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाढत्या महागाईच्या काळात अवाजवी खर्च टाळून सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने जळगाव शहरात भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक लेवा भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात सहा जोडपी विवाहबंधनात अडकली. या सोहळ्याला जळगाव शहर आणि जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठी उपस्थिती लावली होती.

प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांच्या हस्ते वाल्मीकी ऋषींची महाआरती करण्यात आली, ज्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्यांवर अक्षता टाकून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सर्व नवविवाहितांना संसारोपयोगी वस्तू भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

समाजाचा आदर्श उपक्रम
विवाहातील अनावश्यक खर्च टाळून तो पैसा शिक्षणासाठी किंवा प्रगतीसाठी वापरता यावा, या उद्देशाने कोळी समाज प्रतिष्ठान हा उपक्रम राबवत आहे. या सोहळ्यासाठी लेवा भवनात सकाळपासूनच पाहुण्यांची आणि नातेवाइकांची मोठी लगबग पाहायला मिळाली. चोख व्यवस्था आणि मंगलमय वातावरणामुळे हा सोहळा जळगावकरांच्या चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र कोळी, संजय बाविस्कर, अनिल कोळी, आनंद कोळी, अक्षय सोनवणे, गोकुळ सूर्यवंशी, भाऊसाहेब सोनवणे, भिकन नन्नवरे, सुधाकर बाविस्कर, दीपक कोळी, गणेश बाविस्कर, शिवाजी सूर्यवंशी, रतन बिऱ्हाडे, सतीश कोळी, नरेंद्र सपकाळे, निचलदास साळुंके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound