जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाळ्यात वाढणारे तापमान, शरीरातील पाण्याची कमतरता आणि उष्णतेचा ताण यामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. डिहायड्रेशनमुळे शरीरातील रक्त घट्ट होत असल्याने हृदयाला रक्ताभिसरणासाठी अधिक ताण सहन करावा लागतो. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर जळगावातील महादेव हॉस्पिटलने नागरिकांसाठी हृदयरोगांवरील मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महादेव हॉस्पिटलमध्ये आता हृदयाच्या विविध गंभीर आजारांवर मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार असून अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जाणार आहेत. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंतच्या सेवा मोफत देण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या सुविधेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदय तपासणी, ECG आणि 2D ECHO तपासणी, हृदयाची एन्जिओग्राफी (CAG), एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी तसेच पेसमेकर सुविधा यांचा समावेश आहे. गंभीर हृदयविकार असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि आर्थिक अडचणीमुळे कोणीही उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तसेच आधार कार्ड किंवा आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांसह रुग्णांनी महादेव हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या महादेव हॉस्पिटलमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत ओपीडी सेवा सुरू असून नागरिकांना अधिक माहितीसाठी 9112030055 आणि 9112040055 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



