भुसावळात अवैध प्रवासी पोलिसांच्या ताब्यात; डॉ. उगले यांची कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जॉली पेट्रोल पंपाजवळ एका वाहनात अवैध पध्दतीत प्रवास करणार्‍यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरिकांसाठी प्रवास वर्ज्य करण्यात आलेला आहे. यातच अनेक वाहनांमधून दाटीवाटीने आणि कुणालाही सुगावा लागू न देता प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत आहे. पोलीसांनी अनेक ठिकाणी या प्रकारची वाहने जमा केली असून संबंधीत प्रवाश्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे.

या अनुषंगाने, शहरातील लाईफकेअर हॉस्पीटलजवळ असलेल्या जॉली पेट्रोल पंपाच्या जवळच एका वाहतून प्रवास करणार्‍या सुमारे १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी स्वत: आपल्या सहकार्‍यांसह केली. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content