लघुशंकेचा बहाणा अन् पोलीसांना चकवा देत आरोपी न्यायालयातून फरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपीला पोलीस जिल्हा न्यायालयात हजर करत होते. यादरम्यान त्याने लघुशंकेचा बहाणा करीत पोलिसांचे लक्ष चुकवून पळ काढल्याची सोमवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेचया सुमारास घडली. अरुण भगवान गवळी (वय-२२, रा.गुम्मी ता.जि.बुलढाणा) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लौंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अरुण भगवान गवळी रा.गुम्मी ता.जि.बुलढाणा याला पोलिसांनी अटक केली होती. कोरोना काळापासून तो जामिनावर बाहेर होता. सोमवारी त्याला ताब्यात घेत पोलीस जिल्हा न्यायालयासमोर हजर करणार होते. पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला हजर करण्याकामी सोमवारी जिल्हा न्यायालयात घेऊन आले असता दुपारी ४.४५ च्या सुमारास अरुण गवळी याने लघुशंकेचा बहाणा केला.

पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला लघुशंकेसाठी घेऊन गेले आणि गुन्ह्याच्या केस वॉच यांना गुन्ह्यातील डी.एन.ए. अहवाल प्राप्त नसल्याबाबत कळवीत होते. पोलिसांची नजर चुकवून अरुण गवळी याने पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक सचिन वाघ करीत आहेत.

Protected Content