खिडकीतून डोकावून पाहिले तर..वहिनीने केला आक्रोश !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवाजा बंद असल्याने वहिनीने आत डोकावून पाहिले तर दिराने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची शहरातील गजानन नगरात घटना घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये प्रसिद्ध आचारी म्हणून काम करणारे किरण रघुनाथ महाजन (वय – ३५) रा. गजानन नगर, मोंढाळे रोड, पाचोरा हे २० फेब्रुवारी रोजी आपले दैनंदिन काम आटोपून दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास आपल्या गजानन नगर भागातील घरी आले. दरम्यान काही वेळानंतर त्यांच्या वहिनी यांनी किरण यांना जेवण करण्यासाठी बोलविले असता किरण यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता.

वारंवार आवाज देवुन सुद्धा खोलीतुन प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या वहिणींनी खिडकीतुन आत डोकावून बघितले असता किरण हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन येताच वहिणी यांनी एकच आक्रोश केला. शेजाऱ्यांच्या मदतीने किरण महाजन यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी किरण महाजन यांना मृत घोषित केले. मयत किरण महाजन यांचे पाश्चात्य पत्नी, दोन लहान मुले, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अतिशय हसमुख व शांत स्वभावाचे किरण महाजन यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. किरण महाजन यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Protected Content