संचारबंदी : यशवंत अर्बन पतसंस्थेतर्फे गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

 

धरणगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी करण्यात आली आहे. या कालावधीत हाताला काम नसल्याने गरीब नागरिकांजवळ पैसे नसल्याने त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. धरणगाव येथील यशवंत अर्बन पतसंस्थेतर्फे अशा गरजुंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यशवंत अर्बन पतसंस्थेतर्फे धरणगाव येथील गरीबांच्या वस्तीत जाऊन जीवनाश्यक वस्तूंचे सोशल डिस्टन्स ठेवून वाटप करण्यात आले. जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करतांना संस्थापक चेअरमन डी. जी. पाटील, चेअरमन सम्राट परिहार, सी. के. आबा, व्हाइस चेअरमन शाम काब्रे, सुरेश भागवत, ऍड. चंद्रशेखर पाटील, सचिव किरण मराठे, गौरांग पटेल, राजेंद्र न्हायदे व सर्व कर्मचारी यशवंत पतसंस्था उपस्थित होते.

Protected Content