शिवसेनेकडून ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर भाजीपाला विक्री

शेंदूर्णी, प्रतिनिधी ।  शिवसेना शेंदूर्णी शहरच्यावतीने ‘ना नफा ना तोटा’ यातत्वावर शेंदूर्णी परिसरातील नागरिकांसाठी स्वस्त भाजीपालाचे स्टाँल लावून व सोशियल डिस्टन्स पाळून एक मीटर अंतरावर उभे राहून हँडग्लोज व मास्क लावून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे २०% राजकारण ८०% समाजकारण या शिकवणीनुसार शेंदूर्णी शिवसेना शहराच्यावतीने ‘ना नफा ना तोटा’ यातत्वावर शिवसेनेतर्फे सोशियल डिस्टन्स ठेवत भाजीपाला विक्री करण्यात आली. शिवसेना शहराने राबविलेल्या या उपक्रमाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. शिस्तबद्ध पद्धतीने स्वस्त भाजीपाला खरेेेदी करून उपक्रमाबद्दल शेंदूर्णी येथिल शिवसैनिक शहर प्रमुख संजय सुर्यवंशी, युवासेना प्रमुख अजय भोई, अशोक बारी, बारकू जाधव, अरुण गवळी ,राजू पाटील, भूषण बडगुजर, सोनू नेरपगारे, राहुल कुमावत, राहुल भोई,व अनेक शिवसैनिक यांच्या कार्याचे कौतुक केले व स्वेच्छेने सदर उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल आभार मानले. आमच्या रक्तात शिवसेना असल्याने आम्हाला आमच्या कर्तव्याची आठवण होत असते.शिवसेनेचे शिवसैनिक नेेहमीच आपल्या देशा साठी व महाराष्ट्र साठी आपल्या गावासाठी संकटात एकत्र येतात हेच खरे देश प्रेम आहे सद्या कोरोना चे संकट पूर्ण जगात पसरले आहे त्यातून आपला देश व आपला महाराष्ट्र पण सुटलेला नाही म्हणून राबविलेल्या या उपक्रमाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला.

Protected Content