भुसावळात होमगार्ड पुन्हा कर्तव्यावर रूजू

भुसावळ प्रतिनिधी । राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत गृहरक्षक दल अर्थात होमगार्डच्या कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा सेवेत रूजू करण्यात आले आहे.

भुसावळ प्रतिनिधी राज्य सरकारने होमगार्ड यांना अचानक ड्युटीवरून काढून परिवारावर उपासमारीची वेळ आणली होती. पुन्हा ड्युटीवर घेण्यासाठी मोर्चेही काढण्यात आलेले होते. या पार्श्‍वभूमिवर, राज्य शासनाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आदेश देऊन भुसावळात २५ होमगार्ड यांना सेवेवर हजर होण्याचे आदेश जारी केले आहेत. लॉकडाउन सुरू राहणार तो पर्यत बाजारपेठ पोलीस स्टेशन १० होमगार्ड, शहर पोलीस स्टेशन १० होमगार्ड, तालुका पोलीस स्टेशन ५ होमगार्ड असे एकूण २५ होमगार्ड तिघही पोलीस स्टेशनला भुसावळात ड्युटीवर राहणार आहे.

या आदेशामुळे उर्वरित होमगार्ड मध्ये नवीन उम्मीद निर्माण झाली आहे.त्यांनाही आपले आदेश कधी येणार याकडे लक्ष लागून आहे.संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेल्या होमगार्ड यांना रोजगार उपलब्ध करून दिला म्हणून सर्वांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. कोरोनाच्या आपत्कालानंतरही होमगार्डला सेवेत कायम ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

Protected Content