मद्यसेवन परवाना खरच गरजेचे आहे का ? :डॉ. नितु पाटील यांचा प्रश्न ‘बघा पटत आहे का ? ( भाग ६ )’

 

भुसावळ, प्रतिनिधी । भारतीय नागरिकाला मतदान करण्यासाठी मतदान कार्ड आवश्यक असते. तसेच विविध शासकीय व खासगी कामांसाठी देखील परवाने लागत असतात. मात्र, मद्य सेवन करायला परवान्याची आवश्यकता असली तरी हा परवाना बाळगणारे फारच कमी लोक दिसून येतात. डॉ. नितु पाटील यांनी माहितीच्या अधिकारात भुसावळ शहरातील परवानाधारकांची माहिती मागितली असता त्यांना परवानाधारकांची संख्या कमी कमी होतांना दिसत असून मद्य सेवन कारण्याऱ्यांची संख्या वाढत असल्याचा विरोधाभास पाहावयास मिळाला. वाचा त्यांच्याच शब्दात ‘बघा पटत का ?’ या सदरात

मतदान करायचे आहे………… मतदान कार्ड हवे
बाइक चालवायची आहे……… वाहनचालक परवाना हवा
वकिली करायची आहे……..वकील सनद हवी
परदेशात जायचे आहे……. पारपत्र हवे.
वैद्यकीय कामकाज करायचं आहे……MCI मान्यता हवी
जर प्रत्येक कामकाज करायला काही विशेष शासकीय मान्यता हवी असते.पण

“मद्यसेवन करायला मद्यसेवन परवाना खरच गरजेचे आहे का ?”

माहिती अधिकार अधिनियम नुसार मला मिळालेली भुसावळ शहरातील मद्य परवाना संख्या ,

अ.न     वर्षे . .       परवाने संख्या
१ .       २००६            १५८
२         २००७            १८३
३         २००८            ३६०
४         २००९            ३२५
५         २०१०            २००
६         २०११            २९४
७        २०१२            २८०
८        २०१३             ११६
९        २०१४            ११२
१०       २०१५           0६५

आता या वरून आपल्या काय लक्षात येते?
सांगा खरच वर्षभरात फक्त एवढ्याच परवानाधारक जनतेनेच मद्य प्राशन केले आहे का?

नक्कीच नाही ..मग हि कटकट हवीच कशाला?
सरकारच सरकारला फसवत आहे.
सरकारने कोणतेच बंधन लावू नये.

बिन्दास्त प्या….जास्त प्या…तेवढा महसूल मिळणार…
शेवटी महसूल महत्वाचा…. कारण विकास महत्वाचा..₹

डॉ.नितु पाटील,
०८०५५५९५९९९

Protected Content