मेहरूण शिवारातील ‘त्या’ पार्टीची चौकशी करा; दिपककुमार गुप्ता यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात बंद असताना मेहरूण शिवारातील शेतात पार्टी रंगली होती. त्या पार्टीत वाळूमाफिया आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पार्टीत रम्मीचा खेळही रंगला होता. या पार्टीची सखोल चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेची नियुक्ती करावी अशी मागणी माहिती कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन काळात बंद पाळण्यात आला आहे. या काळात मेहरूण शिवारातील शेतात ओली पार्टी रंगली होती. या पार्टीचा आस्वाद घेण्यासाठी राजकीय व प्रशासनातील काही कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणाला तीन आठवड्याचा कालावधी लोटला गेला आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. या पार्टीची एलसीबीमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्याकडे केली आहे. या पार्टीला जसे नगरसेवक उपस्थित राहिले त्याच पद्धतीने वाळूमाफिया व पोलिस कर्मचारी देखील सामील झाले. त्यामुळे या संदर्भात प्रकरण दाबले जाईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्टीसदर्भात आपण गृहमंत्री, आयजी यांनाही टीवट करून कारवाईची मागणी केली आहे.

Protected Content