आमदार राजूमामा भोळे यांचीच नार्को टेस्ट करा – शिवसेना

जळगाव प्रतिनिधी । १०० कोटींच्या कथित सुपारी प्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांचीच नार्को टेस्ट करा अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे.

आमदार भोळे यांनी सागर पार्कची जमीन लाटण्यासाठी १०० कोटींची सुपारी घेण्यात आल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. यावर शिवसेनेने पलटवार केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी व प्रशांत नाईक यांनी आमदार भोळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सागर पार्क या जागेचा निकाल पालिकेकडून लागला असून राज्य शासनाने पाच कोटींच्या विशेष निधीतून ५७ लाख रूपये मंजूर केले आहेत. सन २०१७ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतरही ते काम आजपर्यंत पूर्ण न होण्यास केवळ आमदार भोळे जबाबादर आहेत. मंत्रालयापासून ते महापालिकेपर्यंत सर्वांना त्यांनी काम सुरू न करण्याच्या सूचना केल्या होत्या. महापालिकेचे तत्कालिन शहर अभियंता सुनील भोळे यांनीच सेवानिवृत्तीपूर्वी ही माहिती दिल्याचे नगरसेवक जोशी यांनी याप्रसंगी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शिवाजीनगरातील जागेवरून आमदार भोळेंनी शहरातील वकिलांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली; परंतु सागरपार्कच्या कामाला विलंब, वॉटरग्रेस तसेच शहरातील जागा असे अनेक विषय भोळेंशी संबंधित आहेत. आमदार भोळे यांचीच नार्कोटेस्ट केल्यास वॉटर ग्रेसमध्ये कोणी किती पैसे घेतले त्यांची नावे समोर येतील, असे बरडे म्हणाले. एकीकडे विकासाच्या गप्पा आणि दुसरीकडे कामांना ब्रेक लावणे अशी दुटप्पी भूमिका आमदारांकडून बजावली जात असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला.

 

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

 

Protected Content