त्या’ भूमी अभिलेख कर्मचार्‍यांची लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरील क्लिप व्हायरल ( व्हिडीओ )

रावेर शालीक महाजन । येथील भूमी अभिलेख खात्यातील दांडी बहादूर कर्मचार्‍यांची शेतकरी खरडपट्टी काढत असलेली क्लिक लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून राज्यभरात व्हायरल झाली असून या कर्मचार्‍याची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रावेर भूमी अभिलेखचे दांडी बहाद्दर व शेतकर्‍यांशी अरेरावी करणारे कर्मचारी चांगलेच गोत्यात आले आहे. या प्रकरणाची दखल खुद्द नगर विकास मंत्रालयाने घेतली आहे. जळगावचे भूमी अभिलेखचे जिल्हाअधीक्षक राजेंद्र कपोते यांनी आज भूमीलेख अशिकारी श्री कुलकर्णी यांना चौकशी अधिकारी म्हणून ताबतोड नेमणुक करून अहवाल मागवीला आहे.

दि ८ रोजी रावेर भूमी अभिलेख मधिल कर्मचारी वेळेवर येत नाही पैसे देऊन कामे होत नाही काम करण्याचे पैसे मागितले जातात या वरुन संतापलेले शेतकरी व येथील कर्मचार्‍यांचा शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला आहे.

संबंधीत भूमी-अभिलेख बद्दल नागरिकां मधून प्रचंड संताप व्यक्त होत असून याची दखल खुद्द नगर विकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी घेतली आहे. भूमी अभिलेखचे जिल्हाअधीक्षक राजेंद्र कपोते यांनी आज भूमीलेख अधिकारी श्री कुलकर्णी यांना चौकशी अधिकारी म्हणून ताबतोड नेमणुक करून अहवाल मागवीला आहे. यामुळे आता तरी संबंधीत कर्मचार्‍यांवर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खालील व्हिडीओत पहा व्हायरल झालेली क्लिप.

https://www.facebook.com/508992935887325/videos/440386963786687

Protected Content